Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) देशाचा गौरव केला आहे. सुमारे 22 दिवसांच्या प्रवासानंतर, चांद्रयान-3 ने (Chandrayaan-3) पृथ्वीची कक्षा ओलांडली आहे आणि आता चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता हे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे वेगाने पुढे जात आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरताच भारत असा इतिहास घडवणार आहे, जो आजपर्यंत जगातील कोणताही देश घडवू शकला नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पूर्णपणे अंधार आहे. कोणत्याही देशाच्या शास्त्रज्ञांना अद्याप याविषयी कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही. आतापर्यंत जगातील कोणताही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)