Telangana News: मातीचं छत कोसळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, तेंलगणातील घटना
वनपाटला गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मातीचे छत कोसळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Telangana News: तेलंगणातील नागरकुर्नुलमध्ये मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. वनपाटला गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मातीचे छत कोसळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेमुळे गावात शोक पसरला आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. नुकताचा झालेल्या मुसळधार पावसामुळे छत कोसळले. त्यामुळे एकाच कुटुंबातील चार जण दगावले. मृतांमध्ये एक महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेचा पोलिस पुढील तपास करत आहे. (हेही वाचा- पुण्यात पिकनिकला गेलेल्या 4 मुलांसह 5 जणांचा बुडून मृत्यू, उद्या सकाळी पुन्हा सुरु होणार बचावकार्य
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)