Radhika Khera Join BJP:  कॉंग्रेसच्या माजी राष्ट्रीय मीडिया समन्वयक, राधिक खेरा यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. दिल्लीच्या भाजप पक्षाच्या मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेतर कॉंग्रेसला मोठा धक्का लागला आहे. राधिका यांनी  सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. होय, मी एक मुलगी आहे आणि मी लढू शकते आणि मी आता तेच करत आहे. मी माझ्या आणि माझ्या देशबांधवांच्या न्यायासाठी लढत राहीन.' असं पोस्टमध्ये लिहलं आहे. दिल्लीत आज सकाळी अभिनेता शेखर सुमन यांनी देखील भाजप पक्षात प्रवेश केला.  भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रीय मीडिया विभागाचे प्रभारी अनिल बलूनी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या उपस्थित दोघांन्ही प्रवेश केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)