CBSE Result Fake News: लक्ष द्या! सीबीएसईच्या आज जाहीर होणार 12वीचा निकाल बनावट, सूचना होत आहे व्हायरल

CBSEचा आज जाहीर होणार 12वीचा निकाल बनावट असल्याचे समजत आहे. तसेच सीबीएसईच्या निकालाबाबत होणारी पोस्ट व्हारल होत असुन पुर्णपणे खोटी आहे.

CBSE Fake News (Photo Credit - Twitter)

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) पहिल्या टर्म बोर्डाचे निकाल जाहीर करण्यासाठी सज्ज आहे. CBSE टर्म 1 च्या निकालाची 36 लाखांहून अधिक विद्यार्थी वाट पाहत आहेत. परंतु आज निकाल जाहीर होणार असल्याचे सांगणारी सोशल मीडिया पोस्ट पूर्णपणे बनावट आहे, कारण CBSE मुख्यालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अंकाऊटवरुन ट्विट केले आहे. विद्यार्थ्यांना खोट्या बातम्या आणि खोट्या वेबसाइट्सपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच निकाल एकदा घोषित केल्यावर, विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वरून CBSE टर्म 1 चा निकाल 2022 तपासू शकतील.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement