Fight in IndiGo Flight Video: गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमधील प्रवाशांमध्ये हाणामारी (Watch Video)
इंडिगो फ्लाइटच्या केबिनमध्ये सामान ठेवण्यावरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही प्रवासी एकमेकांना ओरडताना आणि धमक्या देताना दिसतात.
Fight in IndiGo Flight Video: इंडिगो फ्लाइटच्या केबिनमध्ये सामान ठेवण्यावरून दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही प्रवासी एकमेकांना ओरडताना आणि धमक्या देताना दिसतात. केबिन क्रू आणि इतर प्रवाशांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. दोन पुरुष प्रवाशांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर एकमेंकांना धमक्या दिल्या. परिस्थिती शांत करण्यासाठी फ्लाइट क्रूला हस्तक्षेप करावा लागला. प्रयत्न करूनही प्रवाशांनी आरडाओरडा सुरूच ठेवला आणि एकमेकांना धमक्या दिल्या. (हेही वाचा- रील बनवण्यासाठी तरुणाने दुचाकीने ओढली ट्रेन; धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाला अटक, Watch Video)
प्रवाशांमध्ये जोरदार भांडण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)