UP Bank Loot Video: उत्तर प्रदेशातील एका बॅंकेतून 8.54 लाख रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन चोरट्यांनी महिला कर्मचाऱ्याला बंदुकीच्या धाकावर बंधक बनवून 8.54 लाख रुपये लूटून बॅंकेतून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोन चोरटे बॅंकेत घुसले, महिलेला बंदुक दाखवत बॅंकेतून पैसे लुटले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पाहा व्हिडिओ
In UP's Gonda, a man robs a bank in broad daylight. The assailant held the female cashier hostage using a sickle and decamped with Rs 8.54 lakh in cash. All this is in 35 seconds caught on CCTV. pic.twitter.com/gKgVDyiXjE
— Piyush Rai (@Benarasiyaa) February 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)