Theft At Rajinikanth's Daughter Aishwarya's House: रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याचे सोन्या-हिऱ्याचे दागिने चोरीला, एफआयआरमध्ये 'या' लोकांवर वाढला संशय

चोरीच्या दागिन्यांमध्ये हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी ऐश्वर्याने तिनामुपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Aishwarya Rajinikanth

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आणि निर्माते यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth) हिचे लाखोंचे दागिने चोरीला गेले आहेत. मौल्यवान दागिन्यांची किंमत लाखांत सांगितली जात आहे. चोरीच्या दागिन्यांमध्ये हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी ऐश्वर्याने तिनामुपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ऐश्वर्याने सांगितले की, चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये हिऱ्यांचा सेट, जुने सोन्याचे दागिने, नवरत्न सेट, नेकलेस आणि बांगड्यांचा समावेश आहे. ऐश्वर्याने 2019 मध्ये तिची बहीण सौंदर्याच्या लग्नात शेवटच्या वेळी हे दागिने वापरले होते. त्यानंतर त्यांनी हे दागिने लॉकरमध्ये ठेवले होते. एफआयआरच्या प्रतीनुसार, ऐश्वर्याने हे दागिने तिच्या लॉकरमध्ये ठेवले होते आणि कुटुंबीयांना याची माहिती होती. ऐश्वर्याने घरातील कामे करणाऱ्या 3 जणांवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now