Jai Shree Ram Tsunami For Hanuman: 'हनुमान' चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, थिएटरमध्ये 'जय श्री राम'च्या घोषणा (Watch Video)

दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी आपला चित्रपट पौराणिक कथेवर आधारित असल्याचे नाकारले आहे. ते म्हणतात की ही कथा भारताचा इतिहास आहे. दुसरीकडे, हनुमानच्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटातून 5 रुपये अयोध्येतील श्री राम मंदिराला देण्याचे आश्वासन दिले आहे.

Hanuman Film

Hanuman Film Gets Good Response: प्रशांत वर्मा दिग्दर्शित तेजा सज्जाचा 'हनुमान' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहे तुडुंब भरली असल्याची परिस्थिती आहे. हा चित्रपट प्रेक्षक पूर्ण भक्तिभावाने पाहत आहेत. चित्रपट पाहताना चित्रपटगृहांमध्ये 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या जात आहेत. सोशल मिडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. चित्रपटगृहात 'जय श्री राम', 'जय बोलो हनुमान' अशा घोषणा दिल्या जात आहेत. या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी आपला चित्रपट पौराणिक कथेवर आधारित असल्याचे नाकारले आहे. ते म्हणतात की ही कथा भारताचा इतिहास आहे. दुसरीकडे, हनुमानच्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटातून 5 रुपये अयोध्येतील श्री राम मंदिराला देण्याचे आश्वासन दिले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी ही मदत केली जाईल. 'हनुमान' हा प्रशांत वर्मा लिखित आणि दिग्दर्शित सुपरहिरो चित्रपट आहे. यामध्ये तेजा सज्जा मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर विनय राय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार आणि राज दीपक शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (हेही वाचा: Akshay Kumar Metro Viral Video: मुंबईतील रहदारी टाळण्यासाठी अक्षय कुमार आणि दिनेश विजन यांनी निवडली मेट्रो, अभिनेत्याच्या प्रवासाचा व्हिडिओ झाला व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now