सध्या जगभरात फिफा विश्वचषक 2022 ची धूम पहायला मिळत आहे. स्पर्धेतील शेवटचा सामना सध्या अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान सुरु आहेत. अशात फिफा वर्ल्ड ट्रॉफीची पहिली झलक समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या हस्ते या ट्रॉफीचे अनावरण झाले आहे. दीपिका सध्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठी कतारमध्ये आहे. दीपिका पदुकोण फिफा वर्ल्ड ट्रॉफीवरून पडदा काढतानाचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. दीपिकाने माजी स्पॅनिश गोलकीपर इकर कॅसिलाससोबत (Iker Casillas) या ट्रॉफीचे अनावरण केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)