Beating Of Driver In Bhopal

Viral Video: मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात सिटी बसमध्ये गुंडगिरी केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोन तरुणांनी चालकाला चालत्या बसमध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 मिल परिसरात दोन लोक चालत्या बसमध्ये चढले आणि त्यांनी चालकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बसमध्ये बसलेल्या काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्या लोकांनी त्यांना  धमकावले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे लोक ड्रायव्हरला मारहाण करत असताना कंडक्टर शांतपणे बघत राहिला, त्याने ड्रायव्हरला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही. ही घटना मंगळवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. विवेक उधवानी असे चालकाचे नाव असून हल्ला करणारे दोन्ही तरुण हे खासगी बसचे कर्मचारी आहेत. हे देखील वाचा: Raj Thackeray on Marathwada Flood: सरकारने शेतकरी पण 'लाडका' आहे हे दाखवून द्यावं; मराठवाड्यातील पूरस्थितीवरुन राज ठाकरेंचे आवाहन

शहर बस चालकाला मारहाण

आरोपी दोघांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पण रेकॉर्डिंग आधीच सर्व्हरमध्ये सेव्ह होते. या घटनेनंतर बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण होते.