Tim Bergling’s 32nd Birthday Google Doodle: स्विडीश डिजे टिम बर्गलिंग ला National Suicide Prevention Week  दरम्यान डूडल द्वारा म्युझिकल श्रद्धांजली (Watch Video)
Tim Bergling । PC: Google Homepage

गूगल (Google) या सर्वात मोठ्या सर्च इंजिनने आज त्यांच्या होमपेज वर प्रसिद्ध स्विडीश डीजे प्रोड्युसर, गीतकार टिम बर्गलिंग (Tim Bergling) ला आपलं डूडल (Doodle) अर्पण केले आहे. Tim Bergling हा Avicii म्हणून देखील ओळखला जातो. Avicii साठीचं आजचं गूगल डूडल खास आहे. सध्या अमेरिकेमध्ये National Suicide Prevention Week आहे. Tim Bergling ने 2018 साली आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट केला. आज Tim Bergling च्या 32 व्या जयंती निमित्त त्याचे काही फोटोज अ‍ॅनिमेटेट करून खास व्हिडीओ देखील गूगलने प्रसिद्ध केला आहे.

आजच्या व्हिडीओ डूडल मध्ये Avicii चं सगळ्यात लोकप्रिय ट्रॅक “Wake Me Up” बनवण्यात आलं आहे. यामध्ये Alyssa Winans, Olivia When, आणि Sophie Diao या कलाकारांचा समावेश आहे. नक्की वाचा: Shirley Temple Google Doodle: अमेरिकन गायक, डांसर शिरलेय टेम्प्ल यांना मानवंदना देण्यासाठी गूगलचं खास डूडल.

Video of Tim Bergling's 32nd Birthday Google Doodle 

इलेक्ट्रॉनिक संगीताला मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये आणि त्याला जगात प्रसिद्धी मिळवून देण्यामध्ये टिम बर्गलिंग याचा मोलाचा वाटा आहे. 1989 साली आजच्या दिवशीच टिमचा स्वीडन च्या स्टॉकहोम मध्ये जन्म झाला. वयाच्या 16 व्या वर्षापासूनच तो ट्यून मिक्सिंग करत होता. 2011 साली डान्स अ‍ॅन्थम ‘Levels’ प्रसिद्ध झालं आणि त्याने पॉप चार्ट मध्ये त्याची धूम झाली.

संगीत क्षेत्रात काम करण्यासोबतच तो एक मनावतावादी देखील होता. त्याने 2012 साली अमेरिका दौर्‍यादरम्यान 'हाऊस ऑफ हंग़र' सुरू केले. याद्वारा भूकेलेल्यांना अन्न मिळावं म्हणून मदत केली. एकीकडे अमाप यश, प्रसिद्धी, अवॉर्ड्स मिळवत असताना टिम मानसिक आरोग्यासाठी संघर्ष करत होता. वयाच्या 28 व्या वर्षी त्याने आत्महत्या केली आणि मृत्यूला कवटाळले. आता बर्गलिंग परिवाराकडून त्याच्या स्मरणार्थ तरूणांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी खास अभियान राबवले जाते. त्यासाठी एक संस्था काम करत आहे.