Viral Video: ताटात वाढलेल्या माशाने उघडले तोंड; दातांमध्ये चॉपस्टिक पकडलेल्या माशाच्या 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल, Watch
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका प्लेटमध्ये थोडेसे सॅलड घालून मासे दिल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही सुरुवातीला पाहता तेव्हा तुम्हाला मासे मेलेले दिसतात, पण जेव्हा खाणारा एक लाकडी काठी त्यांच्या तोंडाजवळ घेऊन जातो तेव्हा अचानक मासा तोंड उघडतो.
Viral Video: आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो तेंव्हा तो पदार्थ स्वच्छ आणि चवदार असावा अशी अपेक्षा करतो. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सही कोणत्याही ग्राहकाला कोणतीही अडचण येऊ नये, याची पूर्ण काळजी घेतात. असे असतानाही खाद्यपदार्थांबाबत अशी प्रकरणे समोर येतात, ज्याची माहिती ऐकून लोक थक्क होतात. असेच एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
तुम्ही कल्पना करा की जेवणाच्या ताटात दिलेला प्राणी जिवंत झाला तर? इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्येही हेच दिसत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीला प्लेटमध्ये दिलेला मासा अचानक तोंड उघडतो आणि हलू लागतो. (हेही वाचा - Hollywood Movie On Plumber: रानू मंडल पेक्षाही वेगाने बदलले 'प्लंबर'चे नशीब; हॉलिवूड चित्रपटात पाहायला मिळणार Kev Crane चा जीवनप्रवास)
हा व्हिडीओ एखाद्या परदेशी रेस्टॉरंटचा किंवा हॉटेलचा आहे, जिथे प्लेटमध्ये सॅलडसोबत विविध प्रकारचे मासे सर्व्ह केले जातात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका प्लेटमध्ये थोडेसे सॅलड घालून मासे दिल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही सुरुवातीला पाहता तेव्हा तुम्हाला मासे मेलेले दिसतात, पण जेव्हा खाणारा एक लाकडी काठी त्यांच्या तोंडाजवळ घेऊन जातो तेव्हा अचानक मासा तोंड उघडतो. एवढेच नाही तर ती काडी तोंडात घट्ट धरून ठेवतो. कितीही प्रयत्न करूनही ती सोडत नाही. ही घटना पाहून व्हिडीओ पाहणाऱ्यांना धक्का बसला आहे. ताटात जिवंत मासे पाहून नेटकऱ्यां आश्चर्य वाटलं आहे. (हेही वाचा - समुद्रात माशाचे फोटो काढल्यानंतर तरुणाने माशाच्याऐवजी मोबाईल फेकला पाण्यात, Watch Viral Video)
व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. हे कसे घडू शकते याचा तुम्ही विचार करत असाल. हा विनोद आहे की निष्काळजीपणा? या व्हिडिओने लोकांना विचार करायला लावले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत सुमारे एक लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर rhmsuwaidi नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांचा राग अनावर झाला आहे. त्याच वेळी, काही लोक म्हणतात की, हे अत्यंत क्रूर आहे.