संग्रहित - संपादित प्रतिमा

जर का तुम्ही वाहनाने रस्त्यावरून जात आहात आणि मधेच तुम्हाला लघुशंका आली तर तुम्ही काय कराल? साहजिकच वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन सु-सु कराल. मात्र हवेत उडणाऱ्या विमानाच्या पायलटला जर विमान चालवताना लघुशंका आली तर? असाच एक प्रकार अमेरिकेत घडला आहे. वैमानिकाला लघुशंका आल्यावर त्याने कोणताही विचार न करता चक्क एका हायवेवर विमान उतरवले आणि आपली लघुशंका उरकली. हायवेवरुन जाणाऱ्या लोकांनी या घटनेचे व्हिडीओ काढले, जे सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

अमेरिकेच्या अलबामा (Alabama) राज्यात हा विचित्र प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन विद्यार्थी हे छोटेखानी विमान चालवत होते. मात्र इंजिनमध्ये काही बिघाड झाल्यानंतर त्यांना हे विमान रस्त्यावर उतरावे लागले. ख्रिसमस सणामुळे हायवेवर ट्राफिकदेखील होते. मात्र प्रयत्नानंतर हे विमान रस्त्यावर सुरक्षित उतरले. विमानातून बाहेर पडल्याबरोबर वैमानिक कशाचाही विचार न करता बाजूला असलेल्या झुडूपात लघुशंका उरकायला गेला.