PM Narendra Modi यांना चिमुकलीचे पत्र, महागाईत होरपळणाऱ्या जनतेच्या वेदना आता तरी कळणार का?

त्यामुळे इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या एका चिमुकलीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच पत्र लिहिले आहे. कृर्ती दुबे (Kriti Dubey) असे या मुलीचे नाव आहे. शाळेत घडलेल्या एका प्रसंगामुळे तिने पंतप्रधानांना पत्र लिहीले आहे.

Mann Ki Baat on inflation | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महागाईच्या झळांनी अवघा देश होळपळत असताना लहान मुलांनाही त्याची धग जाणवू लागली आहे. त्यामुळे इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या एका चिमुकलीने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच पत्र लिहिले आहे. कृर्ती दुबे (Kriti Dubey) असे या मुलीचे नाव आहे. शाळेत घडलेल्या एका प्रसंगामुळे तिने पंतप्रधानांना पत्र लिहीले आहे. या पत्रात 'मोदीजी तुम्ही खूप महागाई (Inflation) केली आहे. पेन्सिल आणि रबरही महाग केले आहे. कृपा करुन महागाई (Mann Ki Baat on inflation) कमी करा', असे अवाहनच या मुलीने पंतप्रधानांना केले आहे. किर्ती दुबे हिचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

कृती दुबे हिने पत्रात म्हटले आहे की, 'माझे नाव कृती दुबे आहे. मी इयत्ता पहिलीत शिकते. मोदीजी आपण खूपच महागाई केली आहे. पेन्सील, खोडरबरही महागले आहेत. आता मला माझी आई पेन्सील मागताच मारते. शाळेत माझ्या वर्गातील इतर मुले पेन्सील चोरतात. मग मला आईला पेन्सील मागावी लागते. त्यामुळे मला मार बसतो'

कृती दुबे हिने लिहिलेले पत्र सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे. या पत्राची दखल घेऊन तरी पंतप्रधान मोदी देशातील महागाई कमी करण्यावर काही पावले उचलणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. कृतीचे वडील विशाल दुबे पेशाने वकील आहेत. त्यांनी म्हटले की, हे पत्र म्हणजे माझ्या मुलीची 'मन की बात' आहे. तिने शाळेत पेन्सील हरवली म्हणून तिच्या आईने तिला मारले. त्यामुळे तिला राग आला आणि तिने पंतप्रधान मोदी यांनाच पत्र लिहले. (हेही वाचा, Realistic OMG: इंद्रदेवाविरुद्ध दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची तक्रार, तहसीलदारांनीही घेतली दखल; उत्तर प्रदेशातील गोंडा येथील घटना)

ट्विट

छिब्रामाऊचे एसडीएम अशोक कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांना या चिमुरडीच्या पत्राची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळाली. आपण मुलाला कोणत्याही प्रकारे मदत करण्यास तयार आहे. तिचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले