Reel Making Viral Video: इंटरनेटच्या या युगात बहुतांश तरुणांना रील्स बनवण्याचे वेड लागले आहे. रिलसाठी तरुण कोणत्याही थराला जायला तयार आहेत. हे तरुण रील्ससाठी जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अनेक लोक धोकादायक डोंगर, खड्डे आणि रेल्वे रुळांजवळ व्हिडिओ बनवतात. अनेक वेळा लोक जीव धोक्यात घालून चालत्या ट्रेनजवळ व्हिडिओ बनवतात, परंतु असे करणे जीवघेणे ठरू शकते आणि याचे जिवंत उदाहरण देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात काही मुलं रुळांच्या जवळ रील बनवायला लागतात, तेवढ्यात तिथून एक हायस्पीड ट्रेन येते आणि पुढच्याच क्षणी असं काहीतरी घडतं ज्यामुळे तुम्हाला धक्का बसेल.
व्हिडीओ बनवताना या मुलांना ट्रेनची धडक बसेल याची कल्पनाही नव्हती, पण सुदैवाने या अपघातात कोणीही मरण पावले नाही, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
हा व्हिडिओ X वर @iSoumikSaheb नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला 2.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यावर एका यूजरने कमेंट केली आहे की, हा मूर्खपणाचा कळस आहे, तर दुसऱ्याने लिहिले आहे- टिकटॉकवर प्रसिद्ध होण्याच्या नादात लोक आपल्या जीवाशी खेळत आहेत.
ट्रेनसमोर व्हिडिओ बनवणारी मुलं
While Making Tiktok Videos A Train Hits the guy in Bangladesh
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 27, 2024
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही तरुण रेल्वे ट्रॅकच्या शेजारी उभे राहून टिकटॉक व्हिडिओ बनवत होते, त्याचवेळी मागून एक हायस्पीड ट्रेन येते आणि त्यांना पकडते.
ट्रेन रुळावर येताच ती मुलं विरुद्ध दिशेला उभी राहतात आणि सेल्फी व्हिडीओ काढू लागतात आणि ट्रेनची धडक त्यांना बसते. बांगलादेशातील रंगपूरमधील सिंगीमारा पुलावरून ही घटना घडली आहे.