Nanded: महाराष्ट्र शासकीय कर्मचार्‍याची कार्यालयीन आवारात चक्क 'घोडा' बांधण्याची मागणी, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण 
horse (Photo Credit: Pixabay)

महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) जिल्ह्यात सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने एक विचित्र मागणी केली. सतीश पंजाबराव देशमुख नावाच्या या कर्मचाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे कार्यालयीन आवारात घोडा (Horse) पार्क करण्यासाठी परवानगी मागितली आहे. सतीश नांडेड जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना शाखेत सहायक लेखापाल पदावर कार्यरत आहेत. त्यांनी 3 मार्च रोजी जिल्हा अधिकारी यांना पत्र लिहिले. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, त्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे. दुचाकीवरून येताना हा त्रास आणखी वाढत आहे. त्यामुळे त्यांना आता ऑफिसला येताना दुचाकीऐवजी घोड्यावरून यायचे आहे.

सतीश म्हणाले की ऑफिसच्या आवारात बाईक पार्क करण्यास परवानगी आहे, मात्र घोडा पार्क करण्यास परवानगी नाही. सतीशने पत्रात सांगितले की, जर त्यांना घोडा पार्क करण्याची परवानगी मिळाली तर ते घोडादेखील खरेदी करतील. सतीश यांचे हे पत्र सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. जिल्हाधिकारी या पत्रावर काय उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आता माहिती मिळत आहे की सतीश यांनी त्यांचे हे पत्र मागे घेतले आहे. (हेही वाचा: Petrol Well In Satara District: सातारा जिल्ह्यात पेट्रोलची विहीर, इंधनाच्या धगीत करपली शेतातील पिकं)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अर्ज मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑर्थोपेडिक्स डॉक्टरांकडून याबाबत अभिप्राय मागविण्यात आला. स्थानिक रुग्णालयाच्या डीनकडून असे उत्तर आले की, घोड्यावरून प्रवास करून पाठीचा त्रास आणखी वाढेल. कदाचित म्हणूनच सतीश यांनी हा अर्ज मागे घेतला असावा. नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी या प्रकरणात इतकेच सांगितले की, असा अर्ज आला होता पण त्यानंतर ज्याने तो मागे घेतला आहे. अशा परिस्थितीत सतीश कडूनच याबाबत अधिक माहिती प्राप्त करता येईल.