इराणने कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांना पुरण्यासाठी मैदानावर खोदले खड्डे? सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसून आल्या दफनभूमी (Photo)
इराणमधील दफनभूमी (Photo Credits: Twitter/@sympare)

चीनच्या वूहान शहरातून बाहेर पडून, आता जवळजवळ सर्व जगांत पसरलेल्या  कोरोना व्हायरसबद्दल (Corona Virus) जगभरातून भयानक चित्रे समोर येत आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत 4600 हून अधिक लोक मरण पावले आहेत, तर 1.25 लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोनामुळे इराणमध्ये (Iran) सुमारे 500 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इराणमधील एका फोटोमुळे सर्वांना चकित केले आहे. हे फोटो उपग्रहाद्वारे घेतले असून, यामध्ये इराणमधील मृतदेह पुरण्यासाठी विशाल मैदानात मोठे खड्डे खोदण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.

अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, इराणमध्ये गेल्या महिन्यात कोरोना विषाणूची पहिली घटना समोर येताच, इराणने मृतदेह दफन करण्यासाठी खड्डे खोदायला सुरुवात केली. हे खड्डे जवळजवळ दोन फुटबॉल मैदानाच्या क्षेत्रफळाइतके मोठे आहेत. अहवालानुसार, राजधानी तेहरानपासून सुमारे 120 किमी अंतरावर कोम (Kom) शहराजवळ या कबरी खोदल्या गेल्या आहेत. उपग्रहातून घेतलेल्या फोटोंमध्ये या कबरी स्पष्ट दिसत आहेत. सध्या इराणमधील सरकारी आकडेवारीनुसार, 10,000 पेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी इराणच्या अनेक शवगृहात काळ्या पिशव्यातील अनेक मृतदेहांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. इराणमध्ये, इस्लामिक परंपरेनुसार, दफन करण्यापूर्वी मृतदेह साबण आणि पाण्याने धुतले जातात, परंतु कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी केलेले मृतदेह, दफनाच्या वेळी कॅल्शियम ऑक्साईडने स्वच्छ केले गेले. यामुळे त्याचा मातीवर अथवा गाडल्या गेलेल्या जमिनीवर कोणताही परिणाम होणार नाही. शवविच्छेदाच्या बाहेर विषाणूची चाचणी करण्यात लागलेल्या वेळेमुळे, मृतदेहाचे एक ब्लॉक सापडले. यामुळेच शवगृहाच्या बाहेर कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी लागलेल्या वेळेमुळे, मृतदेहाचे एक ढीग लागले गेले होते.

सोशल मीडियावरही, कोममध्ये खोदल्या गेलेल्या या खड्ड्यांविषयीचे फोटो व्हायरल होत आहेत. बेहेस्त-ए-मसुमेह (Behesht-e Masoumeh cemetery) असे या कबरीचे नाव आहे. मॅक्सार टेक्नॉलॉजीने प्रकाशित केलेल्या छायाचित्रांवरून असे दिसून आले आहे की ही दफनभूमी ऑक्टोबरमध्ये रिकामी होती, परंतु मार्चच्या सुरूवातीस या रिकाम्या जागा भरलेल्या दिसून आल्या. यासह अजून दुसऱ्या खड्ड्यांचे काम सुरु आहे. (हेही वाचा: इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांनी तयार केली कोरोना व्हायरसची लस; लवकरच होऊ शकते घोषणा, वृत्तपत्र Haaretz चा दावा)

चीननंतर कोरोना विषाणूचा सर्वात जास्त परिणाम इटलीवर झाला (12,462 प्रकरणे, 827 मृत्यू) आहे. त्यानंतर इराण (10,000 प्रकरणे, 429 मृत्यू), दक्षिण कोरिया (7,869 प्रकरणे, 66 मृत्यू) आणि फ्रान्स (2,281 प्रकरणे, 48 मृत्यू) या देशांचे नंबर लागतो