...म्हणून तरुणीचा चेहरा Balloon सारखा फुगला, का ते वाचा
(फोटो सौजन्य- ट्विटर)

Paris: सध्याच्या तरुणाईमध्ये केसांना रंग लावण्याचा ड्रेंट फार लोकप्रिय झाला आहे. तसेच केसांना रंग लावल्याने आपण सुंदर दिसतो असा काही लोकांचा भ्रम ही आहे. मात्र तुम्ही केसाला डाय लावताना काळजी घेता का? नाही. तर थांबा आणि हे वाचा.

पॅरिसमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय इस्टेलने बाजारातून एका कंपनीचा हेअर डाय (Hair Dye) खरेदी केला. तसेच हा डाय लावल्यानंतर तरुणीच्या त्वचेवर जळजळ सुरु झाली. इस्टेलला हे काही वेळा पुरते होईल असेल असे वाटले. त्यामुळे काही वेळातच तिने डोक्याला लावलेला डाय धुवून ती झोपली. मात्र इस्टेल दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तेव्हा तिचे कपाळ, डोळ्यांखालील भाग, नाक आणि चेहऱ्यावरील आजूबाजूचा भार फुग्यासारखा फुगलेला दिसून आला.

या प्रकरणी इस्टेलने त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले. परंतु या हेअर डायचे प्रमाण अयोग्य पद्धतीने घेतले असल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. तसेच इस्टेलचा चेहरा मूळ आकारपेक्षा जास्त झाल्याने श्वास घेण्यासाठी त्रास झाला असल्याचे तिने सांगितले आहे.