Chhatrapati Shivaji Maharaj AI Viral Photo: आभाळामध्ये दडलयं छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप; AI ने साकारलेला शिवरायांचा फोटो वायरल, पाहून तुम्ही ही व्हाल थक्क!
Photo Credit: Instagram

सध्या एक फोटो खूप वेगाने व्हायरल होतोय ज्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj)  प्रतिमा आपल्याला आभाळात दिसून येते. त्या फोटो ला खूप प्रेम मिळत आहे. सोबतच महाराजांना आदर्श मानणाऱ्य प्रत्येक शिवप्रेमी त्या फोटोची खूप प्रशंसा करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी रोजी शिवनेरी इथे झाला होता. ते आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहेत. ते होते म्हणून आज आपण आहोत असे नेहमीच म्हणले जाते. भारताचा इतिहासातील सर्वांत शूर व पराक्रमी राजा म्हंटलं की सर्वात आधी नाव येत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.नेहमीच अनेक शिवप्रेमी त्यांच्या बद्दल सोशल मीडिया वर त्यांचे पोस्ट टाकत असतात. कोण गडावर जाऊन शिव गर्जना गात तर कोण काही वेगळ्या प्रकारे महाराजांवरील  प्रेम व्यक्त करतात. हे ही वाचा: Shivrajyabhishek Sohala Wishes in Marathi: शिवराज्याभिषेक दिनाच्या WhatsApp Status, GIF Images, Facebook Greetings च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा .

 

व्हायरल फोटो मध्ये नेमक काय:

फोटो मध्ये आपल्याला दिसून येते की महाराजांची प्रतिमा आपल्याला आभाळा मध्ये पाहायला मिळते.जे पाहायला खूप आकर्षक दिसतय. हा फोटो AI निर्मित आहे. आजकाल AI च्या काळात आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन नवीन पहायला मिळते.त्यामधूनच हा एक फोटो आहे जो खूप वेगान व्हायरल झाला आहे. हा फोटो shivaji_maharaj_history या इन्स्टाग्राम अकाउंटवरून र करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे.हर हर महादेव.अनेकना हा फोटो खूप आवडला आहे आणि त्यांनी कमेन्ट बॉक्स मध्ये खूप चांगल्या कमेन्ट केल्या आहेत 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' आणि महाराजन प्रती आपला प्रेम व्यक्त केल आहे.