भ्रष्टाचार (Corruption) प्रकरणात मंत्र्यांना तुरुंगात जावे लागण्याच्या घटना केवळ भारतातच घडतात असे नाही. जगभरातील विविध देशांमध्येही असे नमुने आढळतात. एका युक्रेनियन उर्जा मंत्र्यालाही अशाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. युक्रेनच्या एसबीयू सिक्युरिटी सर्व्हिसने (SBU Security Service) दिलेल्या माहितीनुसार, या मंत्री महोदयांनी तब्बल 10 लाख रुपयांची लाच घेतली आहे.
...