तैवानच्या नैर्ऋत्येकडील डोलियू येथे ६.० रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसल्याने राजधानी तैपेईमधील इमारती हादरल्या. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरने (ईएमएससी) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 13 किलोमीटर खोलीवर झाला. तैवानच्या हवामान खात्याने याला दुजोरा दिला आहे. अनेक शहरांमध्ये लोकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. तैवानच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, तैनान शहरातील एका इमारतीचे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत.
...