पाकिस्तान उच्चायुक्तालयाने अनेक भारतीय खासदारांना सदिच्छा म्हणून आंब्याच्या टोपल्या पाठवल्या आहेत. अहवालानुसार, पाकिस्तान उच्चायुक्तालयातून ज्यांना आंबे मिळाले त्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार शशी थरूर, समाजवादी पक्षाचे खासदार मोहिबुल्ला नदवी, झिया उर रहमान बुर्के, अफजल अन्सारी, इकरा चौधरी आणि कपिल सिब्बल यांचा समावेश आहे. मात्र, पाकिस्तानकडून आंबे भेट म्हणून पाठवणे ही काही नवीन गोष्ट नाही.
...