नेपाळ-तिबेट सीमेवर ७.१ रिश्टर स्केलतीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात १२६ जणांचा मृत्यू झाला असून १८८ जण जखमी झाले आहेत. या भूकंपात १००० हून अधिक घरे कोसळली आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी हा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) सांगितले की, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचा केंद्रबिंदू 28.86 अंश उत्तर अक्षांश आणि 87.51 अंश पूर्व रेखांश 10 किलोमीटर खोलीवर होता. नेपाळच्या सीमेजवळ शिझांग (तिबेट स्वायत्त प्रदेश) असे या ठिकाणाचे नाव आहे.
...