मोरोक्कोजवळ झालेल्या बोट अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनला प्रवाशांना घेऊन जाणारी बोट मोरोक्कोजवळ उलटली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी निम्मे पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. 'वॉकिंग बॉर्डर्स' या स्थलांतरितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ५० हून अधिक प्रवासी बुडाल्याची भीती व्यक्त केली जात असून अपघातग्रस्त बोटीमध्ये एकूण ८० प्रवासी होते.
...