मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या घराच्या मागे पत्नी प्रिसिला चॅनचा भव्य पुतळा बनवला आहे. इंस्टाग्रामवर पुतळ्याचा फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, त्यांनी पत्नीचा पुतळा बनवण्यासाठी रोमन पद्धतीचा वापर केला. फोटोमध्ये चॅन पुतळ्याजवळ उभी असल्याचे दिसत आहे. या पोस्टमध्ये झुकरबर्गने डॅनियल अर्शमलाही टॅग केले आहे. त्यांनी चॅनचा हा अप्रतिम पुतळा ज्यांनी बनवला त्यांनी विविध प्रकारची शिल्पे बनवले आहे.
...