साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हा मेकअप कोर्स या वर्षी जानेवारीमध्येच सुरू झाला होता. या कोर्समध्ये, मूलभूत मेकअप तंत्रे शिकवली जात आहेत, ज्यामध्ये आयब्रो पेन्सिल वापरणे, चेहरा हायड्रेट ठेवणे, प्राइमर लावणे, आयब्रो ट्रिमिंग आणि कॅडेट्सचे केस स्टाईल करणे यासारखे सौंदर्य कौशल्ये समाविष्ट आहेत.
...