⚡आंदोलन करणाऱ्या महिलांसमोर झुकले इराण सरकार; हिजाबशी संबंधित वादग्रस्त कायदा घेतला मागे
By Prashant Joshi
इराणमधील ज्या मुली आणि महिला आपले केस, गुडघ्याखालील पाय, हात पूर्णपणे झाकत नाहीत त्यांच्यासाठी कठोर दंड प्रस्तावित आहे. यामध्ये दंड आणि 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा समाविष्ट आहे. गेल्या शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी होणार होती.