अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि अमेरिकेला एकत्र आणण्यासाठी आर्थिक बळाचा वापर करण्याची ग्वाही दिली आहे. ट्रम्प अनेकदा कॅनडाला '५१ वे राज्य' म्हणून संबोधतात. ट्रम्प यांनी आपल्या सूचनेच्या समर्थनार्थ अमेरिकेकडून देण्यात येणारी लष्करी मदत आणि दोन्ही देशांमधील व्यापार तूट अशी कारणे दिली. ट्रम्प यांनी मंगळवारी फ्लोरिडा येथे पत्रकार परिषद घेतली.
...