पॅरिस, फ्रान्समध्ये ऑलिम्पिक खेळ सुरू आहेत, सध्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पदक टेबलमध्ये चीन पहिल्या आणि अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, खेळाडूंना कोविड-19 ची लागण झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 6 ऑगस्ट (मंगळवार) रोजी सांगितले की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या 40 हून अधिक खेळाडूंना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे आढळले आहे.
...