ऑस्ट्रेलियन पर्यटन बेटावर सी-प्लेन कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून तीन जण बेपत्ता आहेत. रॉटनेस्ट बेटावरून मंगळवारी दुपारी उड्डाणा दरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर सेसना २०८ कारवांमधील सात जणांपैकी केवळ एकाला कोणतीही इजा न होता वाचविण्यात यश आले. स्वान रिव्हर सीप्लेन्सच्या मालकीचे हे विमान रॉटनेस्ट बेटापासून ३० किलोमीटर पूर्वेस पश्चिम ऑस्ट्रेलिया राज्याची राजधानी पर्थ येथील तळावर परतत होते.
...