मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. या प्रकरणी त्याच्या शिक्षेविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पाकिस्तानी-कॅनेडियन उद्योगपती तहव्वर राणा याच्यावर २००८ मध्ये मुंबई शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
...