बैलाला कोणत्या रंगाचा राग येतो याचा कधी विचार केला आहे का? असा एक सामान्य समज आहे की "लाल" रंग बैलाला चिडवतो. स्पेनमध्ये बुलफाइटिंग दरम्यान, मॅटाडॉर बैलासमोर लाल कापड धरतात, ज्याला "मुलेटा" म्हणतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बैलाला लाल रंगाचा राग येत नाही. खरं तर, बैल लाल दिसू शकत नाहीत कारण ते कलर ब्लाइंड आहेत. बैलाला राग येतो कारण मॅटाडोर मुळेटा वेगाने हलवतो, त्यामुळे बैल चिडतो आणि लढायला तयार होतो.
...