निरोगी जीवनशैलीसाठी किमान 7 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन देखील हाच सल्ला देते. तथापि, आपल्यापैकी अनेकांना विविध कारणांमुळे ही आरोग्यदायी सवय अंगीकारणे कठीण जाते. तुम्ही वीकेंडमध्ये तुमची झोप पूर्ण केली तर ती गोष्टी चांगली आहे. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी (ESC) च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सादर केलेल्या अभ्यासानुसार, आठवड्याच्या शेवटी पूर्ण झोप केल्याने हृदयविकाराचा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो.
...