भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा काल रात्री उशिरा दुर्गापूर एक्सप्रेसवेवर दंतनपूरजवळ वर्धमानला जात असताना किरकोळ अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या कारचे थोडे नुकसान झाले पण सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, सौरव एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वर्धमानला जात असताना हा अपघात झाला.
...