दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल. दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाने बांगलादेशचा 57 धावांनी पराभव केला. यासह, पाकिस्तान संघाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व सलमान अली आघा करत आहेत. तर, बांगलादेशची कमान लिटन दासच्या खांद्यावर आहे.
...