दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. इंग्लंड संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा संघ आपला सन्मान वाचवण्यासाठी खेळेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक स्पर्धा होईल. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहे. तर, इंग्लंडचे नेतृत्व जोस बटलरकडे आहे.
...