पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. पहिल्या कसोटीतील विजयात विराट कोहलीनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसऱ्या डावात विराट कोहलीने 143 चेंडूत 30 वे कसोटी शतक झळकावले आणि फॉर्ममध्ये परतला.
...