तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने दुसऱ्या डावात 103 धावांत 5 गडी गमावले होते आणि आता त्यांना विजयासाठी 413 धावांची गरज आहे. तर दक्षिण आफ्रिकेला पाच विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवशीचा खेळ निर्णायक असेल. शेवटचे दोन दिवस श्रीलंकेसाठी खूप आव्हानात्मक ठरतील.
...