दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्मृती मानधनाने अप्रतिम फलंदाजी केली. तिने डावाच्या सुरुवातीपासूनच दमदार फलंदाजीचा नमुना सादर केला. मानधनाने 103 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. तिने आपल्या खेळीत 12 चौकार आणि एक षटकार मारला. ती उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मागील सामन्यातही तिने 117 धावांची खेळी केली होती.
...