वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासह भारतीय महिला संघाने 2025 मध्ये होणाऱ्या विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मंधानाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले.
...