राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियासाठी सर्वाधिक 81 धावा केल्या. विराट कोहलीने 56 धावांची खेळी केली. या काळात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.
...