पाचव्या कसोटीत भारतीय फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) टी-20 तडका दिला आहे. पंतने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पंतने 6 चौकार आणि 3 षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह पंत पुन्हा एकदा भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू ठरला.
...