2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 19 वा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उभय संघांमधला हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टी-20 विश्वचषकात पाकिस्तान संघ आतापर्यंत तीन सामने खेळला आहे.
...