IPL 2022 PlayOffs: इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यानंतर प्लेऑफ फेरी गाठणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चौथा संघ ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सवर मुंबई इंडियन्सने 5 गडी राखून विजयाची नोंद केली आणि आरसीबी संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला. क्वालिफायर सामने 24 मे पासून सुरू होणार आहेत.
...