टी-20 विश्वचषक 2021 नंतर मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे त्यामुळे या पदासाठी अनेक माजी क्रिकेटपटूंची नावे चर्चेत आली आहेत. शास्त्रींच्या जागी मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दोन माजी भारतीय क्रिकेटपटूंची नावे चर्चेत आहेत. बीसीसीआय लवकरच कुंबळे आणि लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधू शकते.
...