ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका 25 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेद्वारे दोन्ही संघ त्यांच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) च्या चौथ्या फेरीला सुरुवात करतील. तथापि, कसोटी मालिकेपूर्वी स्टीव्ह स्मिथच्या रूपाने ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे स्मिथ मालिकेतील पहिल्या कसोटीत सहभागी होऊ शकणार नाही.
...