आज नागपंचमी असून चंद्रपूरच्या ताडोबाच्या जंगलात आज एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. जिथे वाघिणी वीराचा बछड्या समोर एक कोब्रा साप बसलेला दिसला. वाघ न घाबरता बसून सावध होऊन सापाच्या दिशेने पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. जिथे खूप वाघ आहेत. या जंगलात वाघांबरोबरच इतर अनेक प्राण्यांसह विविध प्रजातींचे सापही आढळतात.
...