लखनऊ मधील एका खासगी विद्यापीठात बीए एलएलबीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी अक्षिता उपाध्याय हिने वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली. अक्षिता ही मथुरेची रहिवासी होती. सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी तिच्या रूममेटने दरवाजा ठोठावला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सुरक्षारक्षकांच्या मदतीने दरवाजा तोडला असता अक्षिता मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून त्यात लिहिले होते, 'सॉरी आई बाबा, मी चांगली मुलगी नाही.
...