'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्करने 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया' शो मध्येच सोडला आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने आरोग्याच्या समस्यांमुळे हा निर्णय घेतला. तिने अद्याप अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिलेला नसला तरी, शोमधील तिची सहकारी स्पर्धक उषा नाडकर्णी यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "दीपिकाची तब्येत ठीक नाही, तिच्या हातात काहीतरी समस्या आहे. म्हणूनच ती चांगली कामगिरी करू शकली नाही
...