विकी कौशलच्या 'छावा'ची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. अनेक चित्रपट टक्कर डेट असतानाही प्रेक्षक आजही छ. संभाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. छावा या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी 24.03 कोटी, शनिवारी 44.10 कोटी, रविवारी 41.10 कोटी आणि सोमवारी 19.10 कोटींचा गल्ला जमवला.
...